Pramod Pardeshi
#htmlcaption1 Go UP! Pure Javascript. No jQuery. No flash. #htmlcaption2 Stay Connected

Thursday, 22 June 2017

June 22, 2017 0
NMVM Team With Hon State Home Minister Shri. Dr. Ranjit Patil

Tuesday, 13 June 2017

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा – प्रमोद परदेशी

June 13, 2017 0
सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा – प्रमोद परदेशी
WhatsApp Image 2017-06-10 at 12.50.40 AM

प्रतिनिधी: भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगातील युवकांचे आदर्श, प्रेरणास्थान असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची नक्कल करुन खिल्ली ऊडवणाऱ्या ४२० च्या गुन्ह्यातुन जामिनावर बाहेर असलेल्या सहकार राज्यमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा या साठी नरेन्द्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश चे सर्व पदाधिकारी आग्रही आहोत.
महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युती चे सरकार असतांना महाराष्ट्र राज्यातील सहकार राज्य मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची वारंवार बदनामी करत आहेत. काही महिन्यांपुर्वी गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची एका जाहीर सभेत नक्कल करुन खिल्ली ऊडवली होती त्यावेळेस आम्ही त्यांच्याविरोधात सोशियल मीडीया मार्फत निदर्शन केलेले होते आणि काल त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा पक्षावर टिका करुन, “भाजपा शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये फुट पाडत आहे” असे वक्तव्य सत्तेतील मंत्री करताय? या पेक्षा निंदनीय कृत्य कुठलेही असु शकत नाही. ज्या नरेंद्र मोदी साहेब यांच्या कृपेने सत्तेत राहुन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपप्रचार करीत आहे, कमीत कमी गुलाबराव पाटील यांनी आपली पात्रता तपासावी, असे कारस्थान याआधी अनेकवेळा घडलेले आहे, त्यामुळे ४२० च्या गुन्ह्यातुन जामिनावर बाहेर असलेल्या सहकार राज्यमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा या साठी आम्ही आग्रही आहोत, अन्यता गुलाबराव पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असे पत्र मंचाचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्रमोद परदेशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. आमच्या सोबत बोलत असताना परदेशी म्हटले की, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाच्या दैरा मी सध्या करीत आहे लवकरच आंदोलांची तारीख ही जळगाव की पुणे येतून दिली जाईल. मंचाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी आंदोलंसाठी सज्ज व्हावे असे इशारा परदेशी यांनी दिला.


20170609_181508